सूचना

सर्व हक्क त्या त्या लेखकांच्या / प्रकाशकाच्या स्वाधीन.कवितांच्या संकलनासाठी व संग्रहासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे .कोणत्याही प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा आमचा उद्देश नाही .अधिक माहिती साठी व आपल्या अभिप्रायासाठी आम्हाला email पाठवा .swapnilshirsath54@gmail.com

मी मराठी

Total Pageviews

26337

सूची

Sunday, November 24, 2013
माणुसकीच्या शत्रुऊसंगे युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू

लढतिल सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक 
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा,
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्त्राघाता शस्त्रच उत्तर,
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर,
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयि ठरू, जिंकू किंवा मरू

0 comments: